हुक्केरी तालुक्यातील संकेश्वर येथील सैनिक सद्दाम जमादार यांचा 12 डिसेंबर रोजी आजाराने मृत्यू झाला. त्यांना शहरवासीयांनी अंतिम नमन केले.

गुजरातमधील भुज येथे सीमा सुरक्षा दलात कार्यरत असलेले संकेश्वर शहरातील बिरेश्वर नगर येथील सद्दाम मोहम्मद जमादार यांचे आजारपणामुळे निधन झाले.
त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी संकेश्वर शहरातील बिरेश्वर नगरीत ठेवण्यात आले होते. त्याठिकाणी तालुका प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. सीमा सुरक्षा दलात गेली 13 वर्षे सेवा बजावत असलेल्या सद्दाम यांचे 12 डिसेंबर रोजी आजाराने निधन झाले. त्यामुळे त्यांची आई, पत्नी व भावांवर शोककळा पसरली होती.

माजी मंत्री ए. बी. पाटील, पवन कत्ती, नगरसेवक अजित करजगी, श्रीकांत हतनुरे, सुनिल पर्वतराव, जितेंद्र मरडी, उप तहसीलदार रोहित बडाचिकर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी राजशेखर चौगला, हुक्केरीचे पोलीस निरीक्षक रफिक तहसीलदार, संकेश्वरचे पीएसआय शिवराज नाईकवाडी आदींनी सद्दाम जमादार यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन नमन केले.


Recent Comments