खानापूर सार्वजनिक रुग्णालयातील 19 रुग्णांना नेत्र शस्त्रक्रियेसाठी बेळगावमधील बीम्स सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आले.

खानापूर तालुक्यातील विविध गावातून सार्वजनिक रुग्णालयात आलेल्या 19 रुग्णांना डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी बेळगावच्या बीम्स इस्पितळात पाठवून देण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय नांद्रे यांनी सार्वजनिक रुग्णालयात तपासणी करून त्यांना शस्त्रक्रियेसाठी बेळगाव बिम्स रुग्णालयात पाठविण्यात आले. नेत्रतज्ञ संतोष हसरगुंडगी, बालरोगतज्ज्ञ डॉ. पवन पुजारी, नेत्रतज्ज्ञ भीमगौडा पाटील यावेळी उपस्थित होते.


Recent Comments