आ. अभय पाटील यांच्या विशेष प्रयत्नांमुळे आता 100 रुपयांच्या बॉन्डवर जागा खरेदी करून घरे बांधून राहिलेल्या लोकांना दिलासा मिळणार आहे . आमदार अभय पाटील यांनी ही घरे अधिकृत करून देण्याचा विडा उचलला आहे .
बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत विविध विषयावर चर्चा केल्यानंतर माध्यमांना माहिती देताना सांगितले कि , बेळगाव दक्षिण मतदारसंघातील जवळपास दहा हजार घरे, जी बॉण्ड वर खरेदी केलेल्या जागेवर बांधण्यात आली आहेत त्या घरांच्या जागा त्या लोकांच्या नावावर करून ,त्यांची घरे अधिकृत देण्याचे काम आपण सुरु केले आहे . पण कायद्यात तरतूद नसल्याने हे घरे त्यांच्या नावावर होऊ शकत नसल्याने आपण दुसरा वेगळा मार्ग अवलंबला आहे . त्यापद्धतीने , ही घरे त्या लोकांच्या नावावर करून देण्यासाठी , मागील सहा महिन्यांपासून आपण बंगळूरला प्रयत्न करत आहोत . ड्रोनसर्वेच्या माध्यमातून सर्व सर्वे करण्यात आला आहे . बेळगाव दक्षिण मतदारसंघातील 114 वसाहतींपैकी , 37 अधिकृत स्लम एरिया आहेत . यासंबंधी सर्व कार्यवाही पूर्ण झाली असून , आता घराचा एरिया किती आहे, ती किती स्क्वेअर फुटाची आहेत तसेच त्या घरची चकबंदी देखील करण्यात येणार आहे . आगामी 2 ते 3 महिन्यात सर्व कार्यवाही पूर्ण होईल . 40 वर्षांपासून ही समस्या आहे . मलप्रभा नगर, नाझर कॅम्प चा सर्वे झाला असून त्यांना हक्कपत्र दिले जाणार आहे . उर्वरित सर्व वसाहतींमधील , दहा हजार घरे रेग्युलराईस करण्याचे काम सुरु असल्याचे आमदारांनी सांगितले .
एकंदर आमदार अभय पाटील यांनी आपल्या ,मतदार संघातील जनतेसाठी हा महत्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे . यामुळे , बेळगाव दक्षिण मतदार संघात बॉण्डवर जागा खरेदी करून घरे बांधून राहिलेल्या लोकांना दिलासा मिळणार आहे . आपल्या जनतेची अशा प्रकारे काळजी घेणारे आ . अभय पाटील यांचे हे कार्य खरोखरच प्रशंसनीय आहे .


Recent Comments