बेळगावच्या चिंतामणराव पदवीपूर्व कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) 2022-23 वार्षिक विशेष शिबिर मच्छे येथील शासकीय प्राथमिक कन्नड/मराठी शाळेच्या आवारात सुरु आहे .

नियोजित कार्यक्रमानुसार “कायदेशीर जागरूकता-सहाय्य” या विषयासंदर्भात आणि महानगर पालीके बेळगावचे नगरसेवक ऍड . हणमंत कोंगाळी यांनी मानवी हक्क, त्यांचे महत्त्व, विद्यार्थ्यांना माहित असले पाहिजे असे महत्वाचे कायदेविषयक मुद्दे सांगितले.
चिंतामण राव पदवीपूर्व महाविद्यालयाचे व्याख्याते जीएस बेटगेरी यांच्या अध्यक्षतेखाली , तर याच महाविद्यालयाच्या अधिव्याख्याता श्रीमती व्ही .डी. मुचंडी, विनोदा जाधव, एस. एस. हिरेमठ. व रेणुका कारगी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.



Recent Comments