Belagavi

बेळगावात राष्ट्रवादीतर्फे शरद पवार यांचा वाढदिवस

Share

बेळगावात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा 82वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


होय, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा 82वा वाढदिवस. यानिमित्त बेळगावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात आज केक कापून शरद पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. जिल्हाध्यक्ष अमोल किरण देसाई यांच्याहस्ते केक कापण्यात आला. त्यानंतर हिंडलगा लक्ष्मीनगर येथील इव्हान लोमॅक्स यांच्या वृध्दाश्रमाला भेट देऊन तेथील रहिवाशांना फळे आणि मिठाई भेट देण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमोल देसाई, सरचिटणीस जोतिबा चव्हाण-पाटील, इवाम मंतेरो, गौतम कांबळे, दुर्गेश मेत्री, विनायक पाटील, सदानंद पाटील, राजू पाटील, इस्माईल मुल्ला, धनपाल अगसीमनी, प्रभावती भालेकर, शुभांगी पवार, प्रेमा पाटील व अन्य पक्ष कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: