Kagawad

आमदारद्ववयींचा हेस्कॉम अधिकाऱ्यांना इशारा: शेतकऱ्यांना सिरीज प्रणालीनुसार द्या वीज

Share

राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पंप संचाला दररोज सात तास वीज पुरवठा करत असल्याच्या उर्जामंत्र्यांचे विधान काही ठिकाणीच लागू होते. अथणी व कागवाड तालुक्यातील अनेक गावांमध्ये ६ तासांपेक्षा कमी वीजपुरवठा होतो. कागवाड आमदार श्रीमंत पाटील व अथणीचे आमदार महेश कुमठल्ली यांनी संयुक्तपणे, हेस्कॉम विभागाने ‘सिरीस’ प्रणालीनुसार वीज उपलब्ध करून शेतकऱ्यांच्या समस्यांना उत्तर द्यावे, असा कडक इशारा अधिकाऱ्यांना दिला.

कागवाड आणि अथणी तालुक्यातील गावांना वीजपुरवठा करणाऱ्या मुरगुंडी हेस्कॉम सबस्टेशनवर शनिवारी दोन्ही आमदारांनी एकत्रितपणे 5 मेगावॅट उच्चक्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी भूमी पूजन केले.

गेल्या काही दिवसांपासून मुरगुंडीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या अनेक गावांना वीजपुरवठा होत नाही. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी दोन्ही आमदारांसमोर संताप व्यक्त केला. यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी ट्रान्सफॉर्मर बसवण्याच्या कामाचे भूमिपूजन करून शेतकऱ्यांच्या समस्या जागीच विचारल्या. त्याच ठिकाणाहून त्यांनी जिल्ह्यातील सर्व अधिकार्यांशी आणि हेस्कॉम विभागाचे राज्य एम.डी. , भारती यांच्याशी चर्चा करून दररोज 7 तास वीज पुरवठा होत नाही तोपर्यंत सिरीस प्रणालीनुसार वीज पुरवठा करण्याचे आदेश दिले. त्याला अधिकाऱ्यांनी प्रतिसाद देत वीज पुरवठ्याबाबत आमदारांना आश्वासन दिले.

यावेळी शेतकऱ्यांनी महावीर आवटी, ए.एम.माकणी, जे.बी.अंबी यांना त्यांच्या समस्यांबाबत विचारणा केली. भाजप पक्षाचे नेते आर.एम.पाटील, मुरगप्पा मगदुम, महादेव कोरे, पुष्पक पाटील, राम सद्दी, सिद्राय काळेली, सुनिल पवार, कुमार पाटील, सुनील पाटील, कृष्णा पुजारी, बसू पाटील यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

Tags:

hescom-department-officials-should-coordinately-supply-electricity-to-farmers-pump-sets/