Savadatti

दास श्रेष्ठ श्री कनकदासांची 535 वी जयंती साजरी

Share

कनकदास जयंती उत्सव समिती आणि क्रांतिवीर संगोळी रायण्णा उत्सव समिती सवदत्ती यांच्यावतीने दास श्रेष्ठ श्री कनकदासांची 535 वी जयंती साजरी करण्यात आली .

कनकदास जयंती उत्सव समिती आणि क्रांतिवीर संगोळी रायण्णा उत्सव समिती सवदत्ती यांच्यावतीने दास श्रेष्ठ श्री कनकदासांच्या 535 व्या जयंती कार्यक्रमाचे उदघाटन कागीनेले कनक गुरुपीठाचे जगद्गुरू श्री निरंजनानंदपुरी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले . यावेळी केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी उपस्थित होते .

दासश्रेष्ठ कनकदासाची वैचारिक विचारसरणी, सामाजिक चिंतन , समान समाज घडवण्याची इच्छा आणि समाजातील अत्याचार दूर करण्याचे दाखवलेले मार्ग आजही समर्पक आहेत.
कार्यक्रमाला संबोधित करताना अशा महापुरुषाला एका जातीपुरते मर्यादित न ठेवता जगाला भक्तीचा मार्ग दाखविणाऱ्या भक्त कनकदास यांचा आदर्श आजच्या तरुणांनी अंगीकारला पाहिजे असे केपीसीसी कार्याध्यक्ष आ . सतीश जारकीहोळी म्हणाले .

Tags: