Belagavi

सुभाष नगर येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

Share

डॉ . कोडकणी आय सेंटरच्या वतीने , सुभाष नगर येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .
व्हॉइस ओव्हर : शनिवारी , बेळगावच्या सुभाषनगरातील ,श्री सिद्धशंभो महादेव महागणपती मंदिर , पहिला क्रॉस येथे , डॉ . कोडकणी आय सेंटरच्या सहकार्याने ,सिद्धशंभो ट्रस्ट कमिटी , सिद्धेश्वरी महिला मंडळ , तसेच शंभो युवक मंडळातर्फे , मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .

या शिबिरात ,रातांधळेपणा , डोळे लाल होणे किंवा दुखणे , डोळा तिरळा होणे , चष्म्याचा नंबर , नेहमी डोळ्यातून पाणी येणे , लहान मुलांचे दृष्टिदोष, बीपी किंवा डायबेटीस रुग्णांसाठी मोफत नेत्र पडदा तपासणी आदी तपासण्या करण्यात आल्या .
यावेळी नेत्र शिबिराचे आयोजक प्रवीण पाटील यांनी , हे शिबीर आयोजित करण्याचा हेतू स्पष्ट केला . आजकाल मोबाईलच्या जास्त वापरामुळे अगदी लहान वयातच डोळ्यांच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत . अगदी लहान वयातच मुलांना चष्मा लागत आहे . यासाठी जास्तवेळ टीव्ही बघणे हे देखिल कारण आहे . आमच्या भागातील लोकांची नेत्र तपासणी करून , त्यांच्या डोळ्यांचे आरोग्य चांगले राखण्याच्या उद्देशाने आम्ही कोडकणी आय सेंटरच्या सहकार्याने हे शिबीर आयोजित केले आहे असे सांगितले . (बाईट )
डॉ . कोडकणी आय सेंटरच्या तज्ञ् डॉक्टरांकडून शिबिरार्थींची नेत्र तपासणी करून , त्यांना योग्य सल्ला आणि मार्गदर्शन करण्यात आले . सुभाषनगर मधील रहिवाशांनी या शिबिराचा लाभ घेतला .

यावेळी मंडळाचे विनायक पाटील , अभिषेक पाटील , सुरेश रणसुभे , सुनील जाधव , विशाल खंडागळे , सचिन चव्हाण , रेखा पाटकर , श्रुती कांबळे , चित्र बडिगेर , अखिल आदी उपस्थित होते .

Tags: