खानापूर तालुक्यातील रामापूर गावातील मन्सूर भयभेरी यांच्या घराला पहाटे अचानक आग लागून घराच्या छतासह संपूर्ण घर जळून खाक झाले.

मन्सूर बॅटरी दुरुस्तीचे काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. बॅटरी दुरुस्तीसाठी चार्जिंगला लावल्या असताना शॉर्टसर्किटने ही आग लागल्याचा अंदाज आहे. त्याच्या घरात वीस बॅटरी होत्या. त्यांच्यामुळे हा अपघात झाला असावा असा अंदाज आहे.


Recent Comments