Chikkodi

11 डिसेंबर रोजी निपाणी तालुक्यातील भोज गावात तिसरे कन्नड साहित्य संमेलन

Share

निप्पाणी तालुक्यातील भोज गावातील शांतीसागर स्मृती सभागृहात 11 डिसेंबर रोजी तिसरे कन्नड साहित्य संमेलन होणार असून त्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे.” कन्नड संमेलन यशस्वी करण्यासाठी बहुतांश सीमावर्ती गावांतील देणगीदारांनी नियोजन केले असून, हे संमेलन मोठ्या दिमाखात पार पडेल, अशी माहिती कन्नड साहित्य परिषदेचे निप्पाणी तालुकाध्यक्ष इराण्णा शिरगावी यांनी दिली.

११ डिसेंबरला होणाऱ्या या संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेचे कन्नड साहित्य परिषदेचे निप्पाणी तालुकाध्यक्ष इराण्णा शिरगावी यांचा हस्ते प्रकाशन करण्यात आले.
कसापा सचिव आणि शरण साहित्य परिषदेचे अध्यक्ष मिथुन अंकली यांनी या कार्यक्रमाची माहिती देताना सांगितले की, साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी तीन बैठका झाल्या असून, संमेलनाचा 60 % खर्च हट्टे दाम्पत्य करणार आहे. 11 डिसेंबर रोजी सकाळी 7 .30 वाजता ध्वजारोहण होणार आहे . सकाळी 8 वाजता श्री भुवनेश्वरी पूजन होणार आहे. नंतर संमेलनाध्यक्ष दयानंद गलाटे यांच्या स्वागतासह प्रथमच 300 फूट लांबीची कन्नड ध्वज मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत सर्व अधिकारी आणि लोकप्रतिनिधी सहभागी होतील, असे ते म्हणाले.

“सकाळी 10 वाजता चिंचणी मठाचे अल्लम प्रभू श्री, खडकलाटचे शिव बसव श्री, नांदणी मठाचे जिनसेन भट्टारक स्वामीजी, कवलगुड्ड येथील सिद्धयोगी अमरेश्वर स्वामी यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा होणार आहे. कन्नड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष टी.एस. नागभरण संमेलनाचे उद्घाटन करतील. धर्मादाय , हाज आणि वक्फ मंत्री शशिकला जोल्ले अध्यक्षस्थानी असतील. संमेलनाचे अध्यक्ष अद्वयानंद गळतगे असणार आहेत . मिथुन अंकली यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन केएलईचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर यांच्या हस्ते होणार आहे. प्रकाश हुक्केरी, महांतेश कवटगीमठ, सोमशेखर जमशेट्टी, दीपक गुडगनट्टी, चंद्रकांत कोठीवाले , डॉ. एस.आर. पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

.दुपारी 12 वाजता डॉ.एच.आय.तिम्मार यांच्या अध्यक्षतेखाली चिंतन परिषद होणार आहे.संध्याकाळी 4:30 वाजता देणगीदारांचा सत्कार करण्यात येणार आहे.सायंकाळी 5 वाजता निडसोशी मठाचे स्वामीजी , आडी मठाचे शिवानंद स्वामी , चिक्कोडीचे संपादना मठाचे स्वामीजी आणि आडी सिद्धेश्वर स्वामीउपस्थितीत समारोप समारंभ होणार आहे.

पत्रकार परिषदेत कन्नड साहित्य परिषदेचे पदाधिकारी , हाल शुगरचे संचालक आप्पासाहेब जोल्ले, रामगौडा पाटील, बिरेश्वर बँकेचे चेअरमन जयनंद जाधव, प्रशांत पाटील, डॉ.सुदर्शन मुरबट्टे , स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष रजनीकांत चौगले, कसाप व करवेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: