Belagavi

रमेश जारकीहोळींसोबत नागेश मन्नोळकर यांची दिल्ली वारी : बी एल संतोष यांची घेतली भेट

Share

हिंडलगा ग्राम पंचायतीचे अध्यक्ष नागेश मन्नोळकर याना माजी मंत्री व आ . रमेश जारकीहोळी यांनी ,केंद्रीय मंत्र्यांची भेट घडवून आणली . बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी भाजपकडून तिकीट मिळावे यासाठी ते जोरदार प्रयत्न करीत आहेत .

बेळगाव जिल्ह्याचा ग्रामीण मतदार संघ हा मराठा समाजाचा बालेकिल्ला आहे . त्यामुळे , भाजप , आगामी विधान सभा निवडणुकीसाठी , एक मराठा उमेदवार स्पर्धेत उभा करीत आहे . हिंडलगा ग्राम पंचायतीचे अध्यक्ष नागेश मन्नोळकर हे ग्रामीण भागात , अनेक वर्षांपासून सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात तसेच गोरगरीब जनतेसाठी काम करीत आहेत . ह्या भागामध्ये , समाजाच्या उन्नतीसाठी आणखी जास्त काम करण्याच्या हेतूने , माजी मंत्री तसेच बेळगाव जिल्ह्याचे जेष्ठ राजकारणी रमेश जारकीहोळी यांच्यासोबत , त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक भाजप वरिष्ठांची गाठभेट घेत आहेत . स्वतः रमेश जारकीहोळी यांनी गेल्या दोन दिवसात , भाजप प्रभारी अरुण सिंग , भाजप प्रदेशाध्यक्ष नलीन कुमार कटील, मुख्यमंत्री बोम्मई तसेच अनेक नेत्यांची भेट घेतली आहे .


बुधवारी , त्यांनी बी एल संतोष यांची भेट घेऊन , आपल्या कार्याची माहिती दिली . स्वतः रमेश जारकीहोळी यांनी बी एल संतोष याना नागेश मन्नोळकर यांच्या ग्रामीण क्षेत्रातील राजकीय , सामाजिक क्षेत्रातील कार्याचा परिचय करून दिला .

 

एकंदरीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने , भाजपाची उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे .

 

 

Tags: