Kagawad

घरांसाठी दलितांचे जुगूळ ग्रामपंचायतीसमोर आंदोलन

Share

कागवाड तालुक्यातील जुगूळ-शहापुर गावात पडलेली घरे बांधून देण्याच्या मागणीसाठी दलित कुटुंबांनी आंदोलन केले. माजी आमदार राजू कागे यांनी आंदोलकांची भेट घेऊन येत्या अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अथणी तालुक्यात येणार असून त्यांना भेटून तुमचा प्रश्न सोडवू असे आश्वासन दिल्याने आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.

कृष्णा नदीकाठच्या शहापूर गावातील दलित कुटुंबांची घरे पडली असून त्यांना राज्य सरकारने प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देऊन घरे बांधून द्यावीत या मागणीसाठी दलितांनी जुगूळ ग्रामपंचायतीसमोर गुरुवारी सायंकाळी आंदोलन केले. तुमच्या मागणीला माझा पूर्ण पाठिंबा आहे. येत्या अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अथणी तालुक्यात येणार असून, त्यांना भेटून तुम्हाला न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन माजी आमदार राजू कागे दिल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.

कृष्णा नदीच्या महापुरात शहापूर गाव पूर्णपणे बुडाल्याची वस्तुस्थिती आहे. ही माहिती अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. मात्र, 92 कुटुंबांना अन्यायकारक क-श्रेणीमध्ये वर्ग करण्यात आले आहे. जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी हार मानणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवून आंदोलन मागे घेण्यास सांगितल्यानंतर सर्व दलित कुटुंबांनी आपला विरोध सोडला.
यावेळी ग्रामपंचायत उपाध्यक्ष काका पाटील, सदस्य विजय नाईक, मदगौडा पाटील, बाबासाहेब हुन्नरगी, दीपक पाटील, उमेश पाटील, सुकुमार कांबळे, बबन कमते, उपतहसीलदार अण्णासाहेब कोरे, पीएसआय हनुमंत नरळे व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Tags: