सेंट जोसेफच्या विद्यार्थिनी सानिया जहागीरदार , आफिया शेख यांनी राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेत राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला.

बाल विकास अकादमी, धारवाड आणि कलर हाऊस कल्चरल फोरम गदग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “चिन्नद चित्र चित्तार ” या राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेत सेंट जोसेफ हायस्कूल, धारवाडच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून शाळेचे नाव उंचावले आहे.

या स्पर्धेत सहभागी झालेल्या शाळेतील 200 विद्यार्थ्यांपैकी 10वीची विद्यार्थिनी सानिया परवेज अहमद जहागीरदार आणि आफिया शेख यांनी द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे.या स्पर्धेत राज्यातील विविध शाळांमधील 41 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.सेंट जोसेफ चर्च चे फादर डॉ. रेव्ह. फिडेलिनो, शाळेचे मुख्याध्यापक फादर मायकल सोगे यांनी यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.कला शिक्षक युसूफ अली कलासी, शिक्षक श्याम मल्लनगौडा आदी उपस्थित होते.


Recent Comments