Hukkeri

अवुजीकर महाराजांच्या मठाचे कळसारोहण :गावात कलशाची सवाद्य मिरवणूक

Share

अवुजीकर महाराजांचे या भागासाठी फार मोठे योगदान आहे . असे हिरण्यकेशी साखर कारखान्याचे अध्यक्ष निखिल कत्ती म्हणाले .

त्यांनी आज हुक्केरी तालुक्यातील शिरढाण गावातील अवुजीकर महाराज मठाच्या कलसारोहण सोहळ्यात सहभागी होऊन त्यांनी कल्याणेश्वर महाराजांचे आशीर्वाद घेतले व प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, कल्याण महाराज शिरढाण गावात धार्मिक कार्य करत असून समाजाच्या उन्नतीसाठी भाविकांना मार्गदर्शन करत आहेत.

यावेळी , सुवासिनींची आरती , कुंभमेळा आणि वाड्याघोषात पंचधातूच्या कलशाची मिरवणूक काढण्यात आली . गुब्बलगुड्ड येथील भगवान मल्लिकार्जुन महास्वामी यांनी विशेष पूजा करून अभिषेक केला. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले कि , बसवादी शरण यांनी म्हटल्याप्रमाणे मानवी शरीर हे मंदिरासारखे आहे. आज शिरढाण गावात , अवुजीकर महाराजांच्या मठाला कळसारोहण करण्याचे कल्याणेश्वर स्वामीजींचे कार्य प्रशंसनीय आहे .

त्यानंतर गिरिमल्लेश्वर महाराज, चिन्मयानंद महास्वामी आणि सदाशिव महाराज यांचे प्रवचन झाले. गावातील ज्येष्ठ सिद्धगौडा पाटील यांनी भाषण केले व हरगुरु चर मुर्तींच्या दिव्य उपस्थितीत शिरढाण गावातील अवुजीकर महाराज मठाचा कळसारोहण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडलेल्या ग्रामस्थांचे अभिनंदन केले.
यावेळी सद्गुरू समर्थ अवुजीकर महाराज विश्वस्त समितीचे सदस्य राजागौडा पाटील, राचय्या हिरेमठ, प्रकाश पाटील, इरगौडा पाटील, केम्पण्णा मादार बाळाप्पा राजपूत, सत्ताप्पा गिरीगमवी, सिदगौडा पाटील, संदीप पाटील व शिरढाण ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags: