खानापूर तालुक्यातील मास्केनट्टी व भुरुणकी गावांचा जोड रस्ता बंद केल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. हा रस्ता इतके दिवस सार्वजनिक संपर्क रस्ता होता. या रस्त्याचा वापर करणारे आजूबाजूचे गावकरी शहरात येण्यासाठी या मार्गाचा वापर करत होते . . आता भुरुणकी गावचे प्रकाश पाटील हे त्यांचा खाजगी रस्ता म्हणून रस्ता अडवून जनतेच्या रोषास कारणीभूत ठरले आहेत .

शतकानुशतके लोक या रस्त्यावरूनच प्रवास करीत होते. आजूबाजूचे शेतकरी त्यांचे ऊस कारखान्यांपर्यंत नेण्यासाठी या मार्गाचा वापर करत. या मार्गावरून स्कूल बसेस आणि रुग्णवाहिका धावत होत्या. त्यामुळे जनतेसाठी हा सोयीचा रहदारीचा रस्ता होता. हा सार्वजनिक रस्ता असल्याने शासनाने लाखो रुपये खर्च करून अनेकवेळा शासनाच्या अनुदानातून डांबरीकरण करून रस्त्याची सुधारणा केली आहे. सहायक कार्यकारी अभियंता, पंचायत राज अभियांत्रिकी उपविभाग, खानापूर यांनी त्यांच्या विभागाच्या वतीने 2007-2008 मध्ये पर्वतीय क्षेत्र विकास प्रकल्पांतर्गत 4,93,842 रुपये खर्च करून रस्ता सुधारित केला होता. तर 2011-12 मध्ये मुख्यमंत्री ग्रामीण रस्ते विकास योजनेंतर्गत, खड्डे बुजवण्यासाठी 1,91,899 रुपये खर्च करण्यात आले. व सन 2018/2019 मध्ये तालुका पंचायत अनुदानातून प्रत्येकी 2 लाख रुपये खर्च करण्यात आले. अचानक येऊन , सरकारी अनुदानातून विकसित झालेल्या रस्त्याची जागा आपली असल्याचा दावा केल्याने , प्रकाश पाटील यांच्या विरोधात लोकांनी संताप व्यक्त केला आणि हा विषय न सोडवणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
हा रस्ता खासगी रस्ता असेल तर या रस्त्यासाठी शासनाचे अनुदान का वापरले, असा सवाल जनतेच्या मनात घोळत आहे.याबाबत जनतेने अनेकवेळा शासकीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले असले तरी जनतेतून संताप व्यक्त होत आहे. अधिकारी बेफिकीर वृत्ती दाखवत आहेत. भुरणकी गावातील प्रकाश पाटील व शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात ग्रामस्थ, शेतकरी संघटक व गावपुढाऱ्यांनी भुरणकी ग्रामपंचायत सदस्य नारायण देवगेकर यांच्यासोबत मिळून काल खानापूर तहसीलदार कार्यालयाला घेराव घातला व तहसीलदारांना निवेदन दिले. शासकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच या गावांतील रस्त्यांची समस्या निर्माण झाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. आंदोलकांचे म्हणणे मांडणाऱ्या तहसीलदारांनी हे निवेदन स्वीकारले व रस्त्याची समस्या लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन ग्रामस्थ व शेतकरी व विविध संघटनांना दिले.
एकंदरीत भुरणकी ग्रामपंचायत ह्या समस्येला आणि वादाला तोंड देत आहे. या सगळ्याला भ्रष्ट अधिकारी आणि स्वार्थी लोकच कारणीभूत आहेत, असे जनमानसाचे मत आहे. येथील अधिकारी व लोकप्रतिनिधींना कायद्याचा धाक आहे हे चांगले आहे. अन्यथा हा कायदा तुम्हाला धडा शिकवेल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला
यावेळी , भुरणकी ग्रामपंचायत सदस्य नारायण देवगेकर, ज्योतिबा बेंडीगेरी, इरफान तालिकोटी, शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रवी पाटील, सामाजिक कार्यकर्ते राजू कांबळे. भैरू पाटील, दत्ताराम , पाटील, पुंडलिक गावडे, किशोर गुंडुपकर, शेतकरी व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.


Recent Comments