Khanapur

खानापुर तालुक्यात प्रथमच सीएसआर योजनेअंतर्गत शाळांना संगणक वाटप :- सुरेश देसाई

Share

कर्नाटक वन विकास महामंडळातर्फे खानापूर तालुक्यातील शाळांसाठी संगणक वाटप कार्यक्रम नुकताच पार पडला.

खानापुर तालुक्यात प्रथमच कर्नाटक वन विकास महामंडळाच्या सीएसआर योजनेंतर्गत शाळांना संगणकांचे वाटप करण्यात आले आहे. शाळांना संगणकाचे वितरण करून बोलताना कर्नाटक वन विकास महामंडळाचे संचालक सुरेश देसाई म्हणाले की, एकूण 500 शाळांना संगणकांचे वाटप करण्यात आले. कुप्पटगिरी हायस्कुल , बिदरभावी प्राथमिक शाळा, गर्लगुंजी , कामसोली अशा दहा शाळांचा समावेश आहे . त्यानुसार वनक्षेत्रातील अक्रम जमीन , सक्रम करण्याचे महसूल मंत्री आर अशोक यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. याचा फायदा खानापूरवासीयांनाही करून देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे . त्याचप्रमाणे वन्य प्राण्यांकडून पाळीव प्राणी तसेच जीवित हानी झालेल्या कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी भाजप मंडल अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचोरी, अशोक देसाई आदी उपस्थित होते.

Tags:

under-the-c-s-r-scheme-computer-distributed-to-school-at-khanapur-taluk/