Kagawad

शेडबाळ जैन मुनी कीर्तीस्तंभासाठी मुस्लिम बांधवांची मदत

Share

देशात हिंदू मुस्लिम समाजात वाद निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र याला छेद देत कागवाड तालुक्यातील शेडबाळ गावात जैन राष्ट्रसंत विद्यानंद मुनी महाराज यांचा गौरवस्तंभ उभारण्यासाठी मुस्लिम बांधवांनी देणगी देऊन एक आदर्श निर्माण केला आहे.

होय, सोमवारी शेडबाळच्या जामा मस्जिद कमिटीच्या वतीने हिंदू-मुस्लिम समाजाची एकजूट दाखवत विद्यानंद मुनी महाराज यांच्या कीर्ती स्तंभाच्या उभारणीसाठी देणगी देण्यात आली. फ्लो
यावेळी बोलताना मुस्लीम समाजाच्या जामा मस्जिद कमिटीचे सदस्य अमिन जमादार म्हणाले की, विद्यानंद मुनी महाराज हे आमच्या गावाचे मानबिंदू आहेत. या मुनींनी जगाला अहिंसेची शिकवण दिली. त्यांच्या गौरवार्थ गावात कीर्ती स्तंभ उभारला जात आहे, ही अभिमानाची बाब आहे. त्यासाठी आम्ही देणगी देत आहोत.

मुख्याध्यापक शीतल मालगावे म्हणाले की, राष्ट्रसंत विद्यामुनी महाराज शेडबाळ गावचे सुपुत्र आहेत. मुनीमहाराजांच्या स्मरणार्थ उभारण्यात येणाऱ्या कीर्तीस्तंभासाठी अनेक दानशूर पुढे आले आहेत. त्याचप्रमाणे मुस्लिम समाजानेही यासाठी हातभार लावला आहे. याबद्दल त्यांचे आभारी आहोत.

सेवानिवृत्त मुख्याध्यापक एम. ए. गणे यांनी सर्व मुस्लिम बांधवांचे आभार मानले. कार्यक्रमाला प्रकाश आंद्रे, अण्णासाहेब हांडगे, अशोक बागी, शीतल मालगावे, भरत पाटील, निरंजन नरसगौडर, ऍड. सिदनाळे, जुम्मा मस्जिद कमिटीचे अध्यक्ष नजीर मुल्ला, अमीन जमादार, समीर सारभान, अमीन मोमिन, गुडूभाई नदाफ, जाकिर तेरदाळे आदी मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.

Tags:

/muslim-people-helped-jain-to-build-pillar-of-vidyanand-muni-maharaj-at-kagawad/