Kagawad

शेडबाळ येथील शिबिरात 150 शिबिरार्थींची नेत्र तपासणी

Share

कागवाड तालुक्यातील शेडबाळ येथील श्री भंडारे शिक्षण विकास समितीच्या महिला मंडळाच्या वतीने मिरज येथील प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. शरद भोमाज, डॉ. पूजा भोमाज या दाम्पत्याच्या नेतृत्वाखाली मोफत नेत्र तपासणी व चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शेडबाळ येथील महादेव बळवंत भंडारे प्राथमिक शाळेच्या प्रांगणात हे शिबिर झाले. शिबिरात मोतीबिंदू, काचबिंदू, डायबेटिक रेटिना, अंधत्वाची तपासणी करण्यात आली. डॉक्टर डॉ. रोहित शिरोडकर, डॉ. निधी पाटील यांनी शिबिरार्थींच्या नेत्रतपासणीसाठी सहकार्य केले. 150 शिबिरार्थींची तपासणी करून 80 रुग्णांना चष्मे देण्यात आले.

तर 40 रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक पाटील, सचिव जिनाप्पा नांदणी, मुख्याध्यापिका शीतल मालगावे, महिला मंडळाच्या अध्यक्षा सुजाता यंदगौडर, विदुला अशोका पाटील यांनी डॉक्टरांशी चर्चा करून 50% सवलतीत शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शिबिर यशस्वी करण्यासाठी महिला मंडळ संचालिका शोभा नांद्रे, विमला तुपळे, वैजयंती गणे, संगिता पुदाळे, सरोजनी लगारे, कविता एराज, कलावती लक्कन्नवर, अण्णाप्पा पुदाळे, शशिकांत हिरेमठ आदींनी सहकार्य केले.

Tags:

/kagawad-free-eye-test-camp/