Athani

त्यागमूर्ती महातपस्वी श्री बाळकृष्ण महाराजांची पुण्यतिथी व रौप्यमहोत्सवी कार्यक्रम संपन्न

Share

बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील सत्ती गावात त्यागमूर्ती महातपस्वी श्री बाळकृष्ण महाराजांची पुण्यतिथी व रौप्यमहोत्सवी कार्यक्रमानिमित्त अनेक धार्मिक कार्यक्रम घेतले जात आहेत .

बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील सत्ती गावात त्यागमूर्ती महातपस्वी श्री बाळकृष्ण महाराजांची पुण्यतिथी व रौप्यमहोत्सवी कार्यक्रमानिमित्त गेल्या आठवडाभरापासून धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जात आहेत. बाळकृष्ण महाराजांच्या पूजेचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने पार आला. सलग आठवडाभर विविध पुरोहितांनी गावात येऊन प्रवचन दिले .

आणि महिला परिषदेला प्रगतीशील शेतकरी महिला, कृषी व्यवसाय उद्योजक कविता मिश्रा,आणि हरिका मंजुनाथ या रायचूर जिल्ह्यातील कविताळ गावातील प्रगतीशील शेतकरी उपस्थित होत्या, आज रौप्य महोत्सवाचा शेवटचा दिवस असल्याने गावातील महिलांनी काशीपीठ श्री श्री श्री १००८ जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी अड्ड पालखी उत्सवात श्रींचे गावात कलश मिरवणूक घालून स्वागत करण्यात आले.

काशीपीठ श्री श्री श्री १००८ जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीनी सर्व भक्तां आशीर्वाद देऊन मार्गदर्शन केले .

गेल्या आठवडाभरापासून उत्सवाचे वातावरण निर्माण झाले असून बाळकृष्ण महाराजांच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि धार्मिकपणे पार पडला .

Tags:

balkrishna-maharaj-program-ended/