भारत सरकारच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी सीएससी केंद्रांच्या मालकांनी पार पाडून सरकारच्या सर्व सेवा ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत, असे अथणी येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उत्तर प्रांत प्रमुख अरविंद देशपांडे यांनी सांगितले.

चिक्कोडी तालुक्यातील एकसंबा शहरातील जोल्ले ग्रुप सभा भवन येथे ई-गव्हर्नन्स सर्व्हिस इंडिया (कॉमन सर्व्हिस सेंटर) तर्फे जोल्ले ग्रुप एकसंबा यांच्या संयुक्त विद्यमाने सीएससी आणि आयुष्मान भारत प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
सीएससी केंद्रांनी सरकार आणि जनता यांच्यातील सेतू म्हणून काम सुरू केले पाहिजे. केंद्र सरकारची प्रत्येक सेवा सरकारने ठरवून दिलेल्या दरात ग्राहकांपर्यंत पोहोचवायला हवे, असे ते म्हणाले.

अध्यक्षस्थानावरून बोलताना खासदार अण्णासाहेब जोल्ले म्हणाले की, सीएससीच्या माध्यमातून सरकारी सेवा लोकांपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे आहे. हे नरेंद्र मोदींचे स्वप्न आहे. त्यामुळे चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील जनतेला लाभ मिळावा यासाठी मतदारसंघात 150 सीएससी केंद्र सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सध्या या केंद्रात केंद्र सरकारच्या योजनांबाबत सेवा दिल्या जात आहेत. या केंद्रात राज्य सरकारी सेवांचाही समावेश करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटून विनंती करण्यात येणार आहे. आयुष्मान भारत योजना या सेवेत जोडली आहे. केंद्राच्या प्रमुखांनी जनतेच्या सेवेसाठी पुढे यावे, असे ते म्हणाले.

कार्यक्रमात जिल्हा भाजप उपाध्यक्ष आनंद देशपांडे, सीएससी कर्नाटक प्रमुख विभासकुमार, आयुष्मान भारत कर्नाटक प्रमुख शैलेंद्र, सीएससीचे जिल्हा समन्वयक मल्लिकार्जुन करेरुद्रगोळ आदी उपस्थित होते. सीएससीचे जिल्हा व्यवस्थापक किरण जोशी यांनी प्रास्ताविक केले.


Recent Comments