Khanapur

ब्रेन डेड पतीच्या अवयवांचे दान; निर्मला पाटील यांच्यामुळे अनेकांना जीवनदान

Share

ब्रेन डेड झालेल्या पतीच्या अवयवांचे दान करून खानापूर तालुक्यातील कुप्पटगिरी येथील निर्मला नरसिंग पाटील यांनी अनेकांना जीवनदान दिले आहे.

खानापूर तालुक्यातील कुप्पटगिरी गावचे रहिवासी नरसिंग आप्पाजी पाटील यांच्या मेंदूत रक्तस्राव कोमात गेले होते. ब्रेन डेड झाल्यामुळे त्यांच्यावर उपचारांचाही काही उपयोग होत नव्हता. त्यामुळे त्यांचे अवयवदान केल्याने काहींना नवजीवन मिळणार होते. भाजप नेत्या धनश्री सरदेसाई-जांबोटकर यांनी ही परिस्थिती त्यांची पत्नी निर्मला यांना समजावून सांगितली.

अतिशय साधे आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्व असलेले नरसिंग पाटील हे सुरुवातीपासूनच सामाजिक कार्य करत मोठे झाले होते. अशा दुःखाच्या परिस्थितीत त्यांच्या पत्नीने मन खंबीर ठेवून सामाजिक बांधिलकी जपत पती नरसिंग पाटील यांचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. भाजप नेत्या धनश्री सरदेसाई-जांबोटकर यांनी ही बाब केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, विधान परिषदेचे माजी सदस्य महांतेश कवटगीमठ यांच्या निदर्शनास आणून दिली व कुप्पटगेरी गावप्रमुख उमेश बुवाजी, प्रदीप पाटील, कल्लाप्पा पाटील, सुरेश पाटील, हनुमंत पाटील, कै. नरसिंग पाटील यांचे भाऊ रमेश पाटील, मुलगी मनीषा पाटील, निर्मलाचा भाऊ पांडुरंग यांनी डॉ. मूलीमनी, डॉ. संतोष हजारे यांच्या उपस्थितीत अवयवदान करण्यास सहमती दर्शवली. फ्लो
यासंदर्भात माहिती देताना भाजप नेत्या धनश्री सरदेसाई-जांबोटकर यांनी सांगितले की, या समाजात आपण अवयव नसताना जीव गमावल्याचे पाहिले असून, अशा अवस्थेत नरसिंग पाटील यांना मेंदूतील रक्तस्त्राव झाल्याने ब्रेन डेड घोषित करण्यात आले. त्यांच्या पत्नीने पतीचे अवयव गरजूना दान करण्याचा घेतलेला निर्णय खरोखरच कौतुकास्पद आहे.

एकंदर, पतीच्या मृत्यूनंतर त्यांचे अवयवदान करून कुप्पटगिरीच्या निर्मला पाटील यांनी गरजू रुग्णांना जीवनदान करून नवा आदर्श घालून दिला आहे ही कौतुकाची बाब म्हणावी लागेल.
अल्ताफ बसारीकट्टी, आपली मराठी, खानापूर.

Tags:

posthumous-organ-donation-of-narasingh-patil/