उद्यमबाग येथील तरुण भारत ट्रस्ट संचलित डिव्हाईन किड्स आणि सोमवारी 5 डिसेंबर रोजी , सकाळी दहा वाजता , डिव्हाईन किड्स तसेच ज्ञान प्रबोधन शाळेचा रौप्यमहोत्सव साजरा केला जाणार आहे . शाळेच्या रौप्यमहोत्सवाला लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन उपस्थित राहणार असल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका मंजिरी रानडे यांनी पत्रकार परिषदेत दिली .

शनिवारी , या कार्यक्रमासंदर्भात माहिती देताना , मंजिरी रानडे यांनी सांगितले कि , ज्ञान प्रबोधन मंदिर शाळेची स्थापना 1997 साली किरण ठाकूर यांनी केली . यंदा शाळेला 25 वर्षे पूर्ण होत आहेत . हे शाळेचे रौप्यमहोत्सवी वर्ष असून , या महोत्सवाचे उदघाटन लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन यांच्या हस्ते करण्यात येणार आहे . या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांना तसेच पालकांना देखील कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आहे . रौप्यमहोत्सवानिमित्त वर्षभर जे काही कार्यक्रम घेतले जाणार आहेत त्याची सुरुवात सुमित्राताई महाजन यांच्या हस्ते होणार आहे . आमच्या शाळेचे शैक्षणिक क्षेत्रात खूप मोठे योगदान आहे . ट्रस्टतर्फे खूप चांगले उपक्रम राबवले जातात अशी माहिती त्यांनी दिली .
सोमवारी 5 डिसेंबर रोजी , सकाळी दहा वाजता , ज्ञान प्रबोधन शाळेचा रौप्यमहोत्सवाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून सुमित्राताई महाजन यांचे मौलिक विचार ऐकावेत असे आवाहन त्यानी यावेळी केले .


Recent Comments