जोल्ले दाम्पत्याच्या प्रयत्नातून चिक्कोडी विधानसभा मतदारसंघातील मांजरीवाडी गावातील 33 केव्ही वीज उपकेंद्राचे 110 केव्ही सबस्टेशनवर अपग्रेड करण्यासाठी 10.93 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे असे माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब पवार यांनी सांगितले.

चिक्कोडी तालुक्यातील मांजरी गावात पत्रकार परिषदेत बोलताना अण्णासाहेब पवार म्हणाले, खासदार अण्णासाहेब जोल्ले आणि मंत्री शशिकला जोल्ले यांनी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार येडूर, मांजरी, इंगळी, चंदुरआदी गावातील शेतकऱ्यांच्या पंपसेटना पुरेसा वीज पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी ऊर्जामंत्री सुनीलकुमार यांच्याकडे केली होती. त्यानुसार हा निधी मंजूर झाला आहे. परंतु विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी हे काम आपण मंजूर केल्याचे सांगत आहेत. तथापि हे काम जोल्ले दाम्पत्याने मंजूर केल्याचे अण्णासाहेब पवार यांनी सांगितले.
त्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते शंकर पवार आणि ग्रामपंचायत सदस्य मनोज कीचडे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या पंपसेटना पुरेशी वीज देण्यासाठी मांजरीवाडी वीज केंद्राचे अपग्रेडेशन करण्याची विनंती आपण जोल्ले दाम्पत्याला केली होती. त्यावर त्यांनी प्रयत्न करून अपग्रेडेशनसाठी 10.93 कोटींचे अनुदान मंजूर करवून घेतले आहे. परंतु आम्हीच हा निधी मंजूर करवून घेतल्याचे हुक्केरी पितापुत्र सांगत आहेत. हे सत्यापासून दूर आहे.
पत्रकार परिषदेत अमर यादव, दिलीप पवार, जयराम कानडे, महेश दाभोळे, शशिकांत पाटोळे, राजू पवार, पोपट काटगळे, रमेश माने, तानाजी रावळे, चिदानंद कोळी आदी उपस्थित होते.


Recent Comments