कर्जाला कंटाळून एका शेतकऱ्याने आपल्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना चिक्कोडी तालुक्यातील मांजरी गावात घडली.

मांजरी गावातील शेतकरी पारिस बाळू चौगुले (वय 35) याने आत्महत्या केली आहे.शेतकरी पारिस चौघुले आज पहाटे त्यांच्या शेतात गेले होते. या संदर्भात मयत शेतकऱ्याची पत्नी प्रेमा हिने अंकली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .आपल्या शेतीसाठी स्थानिक व इतर वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतले होते अशी माहिती तिने दिली .
या प्रकरणी अंकली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पीएसआय रुपाली गुडोदगी पुढील तपास करत आहेत. मयत शेतकरी पारीस यांच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.


Recent Comments