निपाणी ग्रामीण पोलीस स्थानकात कर्नाटक सीमेवर अधिक बंदोबस्त ठेवण्याबाबत तसेच महाराष्ट्राच्या मंत्र्यांच्या ३ तारखेला होणाऱ्या राज्य प्रवेशाबाबतही चर्चा झाल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते. निप्पाणी आणि राज्याच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये या उद्देशाने ही बैठक घेण्यात आली. बैठकीनंतर पोलीस अधीक्षक डॉ.संजीव पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की महाराष्ट्राच्या मंत्री बेळगावला येण्याबाबत त्यांना राज्यात प्रवेश द्यायचा की नाही हे आमचे कर्नाटक सरकार ठरवेल .

त्याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नसून, बेळगाव जिल्ह्यातील जनजीवन नेहमीप्रमाणे चालावे. कोणाचीही गैरसोय होऊ नये यासाठी आम्ही कार्यवाही करत आहोत, असे सांगून ते म्हणाले की, कोणीही कोणत्याही परिस्थितीत घाबरू नये.

बैठकीनंतर त्यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरील चेक पोस्टना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेत काही सूचना दिल्याचे कळते.


Recent Comments