Belagavi

चन्नराज हट्टीहोळी यांच्याकडून शिवरायांच्या मूर्तीची पाहणी

Share

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज हे समस्त हिंदूंच्या व हिंदुस्थानच्या नसानसात भरून उरलेले आहेत तसेच छत्रपती श्री शिवाजी महाराजांची मूर्ती प्रत्येक गावोगावी व्हावी अशी सर्व शिवप्रेमींची इच्छा असते, तर छत्रपती श्री शिवाजी महाराजांची सर्वात उंच व मोठी मूर्ती आपल्याच गावात व्हावी अशी आपल्या देशातील सर्वच गावकऱ्यांच्या मनात इच्छा असते.

पण सर्वांच्याच इच्छा आकांक्षा वेळेत पूर्ण होतील असेही नसते, तसेच देशातील सर्वात उंच व सर्वात मोठी मूर्ती बसविण्याचे भाग्य लाभणे यालासुध्दा खूप पुण्याईचे नशीब लागते. यासाठी बेळगाव ग्रामीणचे नेतृत्व करणाऱ्या बेळगाव ग्रामीणच्या विद्यमान व लोकप्रिय आमदार सौ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासारख्या जिगरबाज, लोकप्रिय व कार्य संपन्न लोकनेत्याची गरज असते. तसेच हे पुण्याईचे नशीब श्री. छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यभूमी म्हणून लाभलेल्या कर्नाटक राज्यातील व बेळगाव जिल्ह्याचे नावलौकिक मिळविलेल्या बेळगाव ग्रामीण मतदार संघातील राजहंसगड या गावाला देशातील सर्वात उंच व सर्वात मोठी छत्रपती शिवरायांची मूर्ती बसविण्याचे व बघण्याचे भाग्य बेळगाव ग्रामीणच्या आमदार सौ. लक्ष्मी हेबाळकर यांच्यामुळे बेळगाव जिल्ह्यासह राजहंसगडला लाभलेले आहे.

त्यामुळे भविष्यात बेळगाव तालुक्यातील व सुळगे ग्रामपंचायतीच्या अख्यारितीतील राजहंसगड या किल्ल्याला छत्रपती शिवरायांची पावनभूमी म्हणून आतापासूनच रोज शेकडो पर्यटक, शिवप्रेमी, व अनेक इतिहासकार रोजच भेट देऊन राजहंसगड किल्ला व छत्रपती शिवाजी महाराज यांचे बद्दल आदर व्यक्त करत तसेच एक महिला व कार्यतप्तर आमदार म्हणून बेळगाव ग्रामीणच्या आमदार सौ. लक्ष्मी हेब्बाळकरांकडे खूप कुतुहलाने पहात आहेत.

तसेच राजहंसगड या गावाला इतका मोठा आदर व छत्रपती शिवाजी महाराजांची पावनभूमी व पर्यटन स्थळ करण्यामागे खूप इच्छाशक्तीने परिश्रम घ्यावे लागले असून यासाठी प्रचंड इच्छाशक्ती, मेहनत, व जिद्द, मनात बाळगावी लागून राजकीय इच्छाशक्ती ही तितकीच महत्त्वाची असते. कारण सर्वच राजकीय लोक यशस्वी होतात असेही नसते, पण या सर्व गोष्टींचा मेळ बसवत व येणाऱ्या प्रत्येक गोष्टींना, संकटांना व राजकीय संकटांना, तसेच काही विघ्न संतोषी लोकांच्या संकटांना, धैर्याने सामोरे जावून राजहंसगडाला शिवसृष्टी व पर्यटन स्थळाचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी बेळगाव ग्रामीण चे प्रतिनिधित्व करणाऱ्या तसेच बेळगाव ग्रामीणची आरोग्य लक्ष्मी, बेळगाव ग्रामीणची विकास गंगा, अशा अनेक नावाने ओळखल्या जाणाऱ्या बेळगाव ग्रामीणच्या विद्यमान आमदार सौ. लक्ष्मी हेब्बाळकर तसेच त्यांचे सखे बंधू व कर्नाटक विधान परिषदेचे सदस्य श्री. चन्नराज हट्टीहोळी व आमदार सुपुत्र तसेच काँग्रेसचे नेते श्री. मृणाल हेबाळकर यांनी आपली राजकीय इच्छाशक्ती, मेहनत, व जिद्द पणाला लावून राजहंसगडाला छत्रपती शिवाजी महाराजांची पावनभूमीसह पर्यटन स्थळाचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करून अखेरीस हे काम पूर्णत्वचा मार्गावरून नेऊन पोहोचवले आहे.

मागील 2018 च्या निवडणुकीपूर्वी ज्यावेळी लक्ष्मी हेबाळकर कर्नाटक महिला काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या त्यावेळी आपले सुपुत्र मृणाल व बंधू चन्नराज हट्टीहोळी यांच्यासह राजहंसगड किल्ल्याला वेळोवेळी भेट देत असत त्या त्या वेळी बेळगाव ग्रामीण च्या समस्त मराठी जनतेच्या मागणीनुसार देशातील सर्वात उंच छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती राजहंसगडावर विराजमान व्हावी ही समस्त बेळगाव ग्रामीणच्या मराठी जनतेची व राजहंसगड वाशीयांची मागणी होती. व या मागणीची दखल घेत बेळगाव ग्रामीणच्या आमदार पदाची सूत्रे स्वीकारताच सर्वप्रथम राजहंसगड किल्ल्यावरती श्री छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती व पर्यटन स्थळाचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी विधानसभेत आपली भूमिका स्पष्ट करून आज रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे मूर्तीकाम राजहंसगड किल्ल्यावरती जवळपास 90 टक्के काम पूर्ण होऊन आज ऊन, पाऊस, वारा, याची तमा न बाळगता उद्घाटनाच्या प्रतीक्षेत उभी आहे.

यासाठी काल बुधवार दिनांक 30 नोव्हेंबर 2022 रोजी आमदार सौ. लक्ष्मी हेब्बाळकरांच्या अनुपस्थितीत त्यांचे सखे बंधू व कर्नाटक विधान परिषदेचे सदस्य, तसेच मूर्ती कामाच्या भूमिपूजनापासून ते गडावरती महाराजांच्या चौथर्याचे काम पूर्णत्वास नेईस्तोपर्यंत सतत राजहंसगडाला भेट देऊन योग्य मार्गदर्शन करीत असणारे माननीय श्री. चन्नराज हट्टीहोळी यांनी आज गडावरती भेट देऊन उर्वरित कामांची माहिती घेतली. तसेच छत्रपतींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना …

Tags: