पालकांनी मुलांच्या शिक्षणाकडे, त्यांच्या प्रगतीकडे सतत लक्ष द्यावे असे आवाहन हुक्केरी सरकारी उर्दू आणि कन्नड माध्यमिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रियाझ मुल्ला यांनी केले.

हुक्केरी शहरातील मौलाना आझाद उर्दू व कन्नड हायस्कूल येथे शासकीय सामुदायिक शाळा कार्यक्रमांतर्गत शाळा व्यवस्थापन समिती व पालकांची बैठक एसडीएमसी अध्यक्ष रियाज मुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. इरफान मोमीनदा यांनी या बैठकीचे उदघाटन केले.

यावेळी बोलताना समितीचे सदस्य पत्रकार राजू बागलकोटी म्हणाले की, पालकांनी आपल्या मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी शासनाकडून शैक्षणिक सुविधा मिळवणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मुलांना नेहमी पालकांच्या मार्गदर्शनाची गरज आहे.
शिक्षक एस. एस. करीगार यांनी शाळेला मिळणाऱ्या शासकीय सुविधा व मुलांच्या प्रगतीची माहिती दिली. त्यानंतर पालकांनी शाळेतील सुविधांच्या कमतरतांबद्दल चर्चा केली.
व्यासपीठावर रियाझ अहमद मुल्ला, इरफान मोमीनादा, मिरासाब जमादार, मुजावर, गजबार, मिरासाब बडगामी, महानंद माळगी, केसर मोकाशी आदी उपस्थित होते.
यावेळी शाळेचे शिक्षक के. बी. लोखंडे, पिलाल करिखाझी, निजामुद्दीन वाचमेकर, सचिन मेटगुडली, एस. एस. करीगार, एस. एन. जमादार, ए. एस. अन्नीगेरी, के. एल. कमितकर, एस. के. अथणी व पालक उपस्थित होते.


Recent Comments