निपाणी येथे आज आंतरराज्य पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर एडीजीपी अलोककुमार यांनी कोगनोळी चेकपोस्टला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

निपाणी येथे आज आंतरराज्य पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. त्यात भाग घेतल्यानंतर एडीजीपी अलोककुमार यांनी कोगनोळी चेकपोस्टला भेट दिली. या प्रसंगी त्यांनी स्वतः महाराष्ट्र राज्यातून येणाऱ्या प्रवाशांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले हे विशेष.
यावेळी उत्तर विभागाचे आयजीपी सतीशकुमार, बेळगाव शहर पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील, अपर पोलीस अधीक्षक महानिंग नंदगावी व इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्रातून आलेल्या प्रवाशांनीही मोठ्या आनंदात गुलाबपुष्प देऊन राज्यात प्रवेश केला.


Recent Comments