चिक्कोडी तालुक्यातील सदलगा शहरातील शेतकरी होन्नाप्पा महादेव गावडे, वय 45, यांना त्यांच्या शेतात काम करत असताना नागसापाने चावा घेतल्याने मृत्यू झाला.

होन्नाप्पा यांना सर्पदंश झाल्याची माहिती मिळताच नातेवाईकांनी त्यांना चिक्कोडीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारांचा उपयोग न होता त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे.


Recent Comments