Khanapur

गंदिगवाड येथे लिंगायत पंचमसाली मेळाव्याचे आयोजन २ ए मध्ये सामील करण्याची मागणी

Share

लिंगायत पंचमसाली समाजात जोपर्यंत एकी होत नाही तोपर्यंत त्याचा फायदा उचलून आमच्यात फूट पाडून आपला स्वार्थ साधला जाईल अशी नाराजी बेळगाव ग्रामीणच्या आ . लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या.

मंगळवारी , खानापूर तालुक्यातील गंदिगवाड येथे लिंगायत पंचमसाली मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते . कुडलसंगम लिंगायत पंचमसाली पिठाचे बसवजय मृत्युंजय स्वामीजींच्या प्रमुख उपस्थितीत या मेळाव्याचे उदघाटन पार पडले .

यावेळी आ . लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या कि , सरकारने अन्य कुठल्याही जाती धर्माचे आरक्षण वाढवले असले तरी आम्ही त्याला विरोध दर्शवत नाही . उलट आदराचं करू . परंतु शेतकरी आणि गरीब असलेल्या पंचमसाली समाजाकडे तुम्ही का दुर्लक्ष करीत आहेत .तुम्ही स्वार्थापोटी आमच्या समाजाकडे दुर्लक्ष करीत आहेत का ? आमचा हक्क इतराना देऊन तुम्ही त्याना मोठे करीत आहात आणि बहुसंख्येने असलेल्या आमच्या समाजाचे अस्तिव कमी करीत आहेत . आम्ही कुठल्याही समाजाचे आरक्षण हिसकावून आम्हाला जास्त आरक्षण द्या असे म्हणत नाही . मला किंवा या व्यासपीठावर बसलेल्या कोणालाही आरक्षण नको पण मेहनत करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या गरीब पंचमसाली जनतेला २ए मध्ये आरक्षण मिळायलाच हवे .

राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी म्हणाले कि , आम्ही इतरांचा द्वेष करीत नाही .आम्ही आमच्या हक्कासाठी लढत आहोत . दुसऱ्यांच्या उन्नतीचे काम सुरु आहे . आम्ही दुसऱ्यांचा हक्क मागत नाहीय. आम्ही आमचा हक्क मागत आहोत . खानापूर मध्ये मराठा समाज मजबूत आहे . त्यामुळे त्यांचे हक्क हिरावून घेतले जात नाहीत . आमचे सर्व समाजबांधव आज एकत्रित आले आहेत , आम्ही सर्वाना सोबत घेऊन जाऊ असे ते म्हणाले .

यावेळी पंचमसाली राष्ट्रीय अध्यक्ष विजयानंद काशप्पण्णावर ,माजी मंत्री ए . बी . पाटील . , शशिकांत नाईक , विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी , आर . के . पाटील या मेळाव्यात समाजाचे अन्य नेते उपस्थित होते . रोहिणी पाटील , अडिवेश ईटगी , निंगाप्पा पिरोजी , संगमेष वाली यांचा देखील या मेळाव्यात सहभाग होता .

Tags:

panchamasali-convention-for-2a-reservation/