Belagavi

गोकाक येथे सहा जणांना श्वानदंश : सतीश जारकीहोळी यांनी केली जखमींच्या प्रकृतीची विचारपूस

Share

गोकाक शहरात सहा जणांना कुत्र्याने चावा घेतला. केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी शासकीय रुग्णालयात जाऊन जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली.

 

गोकाक शहरातील नायक गल्ली येथे रविवारी सकाळी कुत्र्याने चावा घेतल्याने गंभीर जखमी झालेल्या सहा जणांवर सार्वजनिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. केपीसीसीचे कार्याध्यक्ष आ . सतीश जारकीहोळी यांनी रुग्णालयालया भेट देऊन डॉक्टरांशी चर्चा करून उपचाराबाबत माहिती घेतली व योग्य उपचार देण्याचा सल्ला दिला.

यावेळी मुख्य वैद्यकीय अधिकारी रवींद्र अंटीन , शिवू पाटील, इलियास इनामदार आदींसह अनेक जण उपस्थित होती.

Tags:

HOSPITAL SATISH JARKIHOLI