विजापूर जिल्ह्यातील बबलेश्वर विधानसभा मतदारसंघातील तळवार समाजाला एसटी प्रमाणपत्र देण्यासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांबद्दल आमदार डॉ. एम. बी. पाटील यांचा तळवार समाजाकडून सत्कार करण्यात आला.

यावेळी सत्कार स्वीकारून बोलताना आ. एम. बी. पाटील म्हणाले, तळवार समाज हा कष्टकरी समाज आहे. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तुम्ही सर्वानी शिक्षणाला प्राधान्य दिले पाहिजे. तुमच्या मुलांना चांगले शिक्षण देऊन सुशिक्षित करून शासनाच्या सुविधा मिळवाल आणि विकास करून घ्याल तेव्हाच शासनाची उद्दिष्टे पूर्ण होतील, असे ते म्हणाले.
यावेळी तळवार समाजाचे कार्यकर्ते साहेबगौडा पाटील यांनी, समाजाला एसटी प्रमाणपत्र मिळण्यासाठी योगदान दिलेल्या सर्वांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी कर्नाटक राज्य तळवार महासभेचे संचालक प्रकाश सोन्नाद, श्रीमंत तळवार, अंबण्णा तळवार, साहेब गौडा पाटील, चंद्रकांत कोळी, चेन्नप्पा कोप्पद, एच. एस. कोराडी, शरणूअण्णा सोन्नाद, माजी आमदार विठ्ठल कटकगोंडा, बाबुगौडा पाटील, हरीश रविगौडा पाटील, धुळकेड सुरेश कन्नमाडी, संगमेश कोलकार, अभिलाष अंबिगेरे व इतर उपस्थित होते.


Recent Comments