Chikkodi

मांजरी, येडूरमध्ये पेयजल प्रकल्पासाठी 9.95 कोटी अनुदान मंजूर : आमदार गणेश हुक्केरी

Share

चिक्कोडी तालुक्यातील मांजरी व येडूर गावातील जलजीवन मिशन योजना आणि बहुग्राम पेयजल प्रकल्पाच्या कामासाठी राज्य शासनाने 9.95 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे अशी माहिती आमदार गणेश हुक्केरी यांनी दिली.

चिक्कोडी तालुक्यातील मांजरीजवळ या कामाच्या भूमिपूजन केल्यानंतर आमदार गणेश हुक्केरी बोलत होते. उन्हाळ्यात तसेच पूर आल्यास लोकांना पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते. ते लक्षात घेऊन नवीन योजना हाती घेण्यात आली आहे. येत्या सहा महिन्यांत हे काम पूर्ण होईल. पुरात घरे गमावलेल्या पीडितांना घरे देण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी पांडुरंग माने. अनिल पाटील, चंद्रकांत पाटील, राहुल देसाई. विपुल पाटील, रामा डांबोळे. अशोक घाटगे, अशोक हवळे, चिदानंद पुजेरी, मुकुंद जाधव, पोपट लामकाने, महेश कागवाडे, शिवानंद करोशी, जयपाल बोरगावे, संजय नरवडे, राजेंद्र घाटगे आदी उपस्थित होते.

Tags: