Savadatti

सवदत्तीमध्ये मातेची दोन मुलांसह मलप्रभा नदीत आत्महत्या

Share

कौटुंबिक त्रासाला कंटाळून एका महिलेने आपल्या दोन मुलांसह नवलतीर्थ जलाशयात उडी घेऊन आत्महत्या केली.

सवदत्ती पोलिस स्टेशनच्या वतनाळ गावाजवळील नविलूतीर्थ जलाशयात तीन मृतदेह आढळून आले. रामदुर्ग तालुक्यातील चुंचनूर गावातील शशिकला उर्फ ​​तनुजा परसप्पा गोडी (32 वर्षे), हिने तिचा मुलगा सुदीप (४ वर्षे ) आणि राधिका या ३ वर्षांच्या मुलीसहित नवीलू तीर्थ जलाशयात उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अग्निशमन दलाच्या मदतीने तीनही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहेत या प्रकरणी सवदत्ती पोलीस ठाण्यात प्रकरण दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.संजीव पाटील यांनी दिली.

Tags:

long-with-3-small-children-mother-flew-to-malaprabha-river/