खानापूर तालुक्यातील नंदगड गावात आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमात तालुक्याच्या आमदार अंजली निंबाळकर यांनी सहभाग घेतला. यावेळी त्यांच्या सेल्फी घेण्यासाठी महिलांची एकच झुंबड उडाल्याचे दृश्य पहायला मिळाले.

होय, दीपप्रज्वलन करून या नवदुर्गा हळदी कुंकू कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी महिलांना हळद कुंकू लावून केले.

त्यानंतर बोलताना आ. अंजली निंबाळकर म्हणाल्या, 2013 पासून हा हळदीकुंकू कार्यक्रम सुरू केला आहे, पण आता पुरुषही या कार्यक्रमाची चौकशी करत आहेत, हे हास्यास्पद आहे. मला कोणी कितीही विरोध केला तरी मी महिलांसाठी माझी सेवा सुरूच ठेवेन. सर्वच क्षेत्रात किमान 50% महिलांनी सक्रीय असले पाहिजे, अशी माझी इच्छा आहे.
महिला सक्षमीकरणासाठी महिला बचत गटांची स्थापना करण्यात आली आहे. यातून महिलांना मोठ्या प्रमाणात समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न होत असून याचा लाभ घेतला पाहिजे. तालुक्यात 15 कोटींच्या अनुदानातून महिलांसाठी सुसज्ज रूग्णालय उभारण्यात येत आहे. आगामी काळात महिलांसाठी अथक परिश्रम घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. BYTE
यावेळी महिलांनी आमदार अंजली निंबाळकर यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी गर्दी करून त्यांच्यासोबत सेल्फी घेतल्याचे दिसून आले. यावेळी मोठ्या संख्येने आलेल्या महिलांना अंजली निंबाळकर यांच्या हस्ते हळदी कुंकू देऊन गौरविण्यात आले.


Recent Comments