Chikkodi

सात्विक व पौष्टिक आहार कसा मिळेल याकडे लक्ष द्या : डॉ. संगीता जोशी

Share

महिला आज प्रत्येक घरातील उत्तम स्वयंपाकी आहेत. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या हातातील मोबाईलमधून अनेक पदार्थांच्या रेसिपी सहज उपलब्ध होतात. सात्विक व पौष्टिक आहार कसा मिळेल याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत अंकलीच्या डॉ. संगीता जोशी यांनी व्यक्त केले.

चिक्कोडी तालुक्यातील मांजरी गावातील जेजेई सोसायटीचे के. पी. मगेन्नावर इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळेत आयोजित पाककला स्पर्धेचे उद्घाटन केल्यावर त्या बोलत होत्या . अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्ष शीतलकुमार मगेन्नावर होते. शंकरगौडा पाटीला नर्सिंग होमचे डॉ. स्नेहा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. अतिथी म्हणून के. पी. मगेन्नावर लक्ष्मी क्रेडिट सौहर्दाचे सीईओ सागर मंगसुळे, महाव्यवस्थापक प्रदीप मगेन्नावार उपस्थित होते.

शिक्षण संस्थेच्या प्राचार्या रुक्मिणी सारापुरे यांनी मान्यवरांचे शाल पांघरून, स्वागत करून व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. या स्पर्धेत अनेक महिलांनी विविध प्रकारचे पदार्थ बनवून सहभाग घेतला. यावेळी संस्थेचे संचालक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. शिक्षिका पूजा नवले यांनी आभार मानले.

Tags: