देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आमदार श्रीमंत पाटील यांच्या हस्ते ५० लाख रुपये खर्चून शालेय इमारतींच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला.

बालदिनानिमित्त सोमवारी कागवाड येथील उर्दू शाळेत शालेय विद्यार्थ्यांना फुले देऊन विद्यार्थ्यांचा आमदारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्रीमंत पाटील फाऊंडेशनतर्फे केळी आणि मिठाई देण्यात आल्यानंतर आमदार मुलांमध्ये मिसळले.

यावेळी आमदार श्रीमंत पाटील म्हणाले की, मी आमदार म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर मतदारसंघातील शासकीय शाळेतील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्यावर भर दिला आहे. शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण प्रकल्प उभारले आहेत. सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचे आवाहन त्यांनी केले. बाईट
कागवाडच्या उर्दू शाळेच्या कार्यक्रमात जिल्हा शिक्षणाधिकारी एम. आर. मुंजे, मुख्याध्यापक एन मकानदार, शाळा सुधारणा समिती अध्यक्ष इर्शाद जमादार, बीआरसी रवींद्र खडकडे, इतर पालक व शिक्षक उपस्थित होते.

शेडबाळ स्टेशन येथील कार्यक्रमात माजी ग्रामपंचायत सदस्य संदीप साळुके, प्रवीण पाटील, नगरपंचायत सदस्य मारुती मक्कनवार, रेणुका होनकांबळे, मुख्याधिकारी बी.आर.फोला, उत्कर्ष पाटील, किरण एंडगौदरा, शाळेतील प्रमुख शिक्षक व पालक सहभागी झाले होते.


Recent Comments