हेस्कॉमच्या निष्काळजीपणामुळे अथणीत दोन कामगारांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. काल संध्याकाळी हेस्कॉमच्या लिंक लाईनवर काम करत असताना वीज प्रवाह संचरित झाल्याने या निष्पाप कामगारांचा मृत्यू झाला.

बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील बळ्ळीगेरी गावाच्या हद्दीत ही दुर्घटना घडली आहे. रोजंदारीवर हेस्कॉममध्ये काम करणारे रायबाग तालुक्यातील हिडकल गावातील हनुमंत हालप्पा मगदूम (वय ३०) आणि अशोक माळी (३५) यांचा मृत्यू झाला. विजेचा धक्का लागल्याबरोबर स्थानिकांनी तातडीने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. वीजेचे काम करण्यापूर्वी हेस्कॉमला माहिती देऊनही वीज पुरवठा प्रवाहित केल्याने विजेचा धक्का लागून या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे..हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणाचे कामगारांचा हकनाक बळी गेला आहे.
याप्रकरणी कर्तव्यात हलगर्जीपणा केलेल्या हेस्कॉम अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि मृत कामगारांच्या कुटुंबीयांना योग्य भरपाई द्यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.


Recent Comments