एक दशकाहून अधिक काळाची मागणी पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर बेळगाव तालुक्यातील होन्निहाळ येथे सर्व ग्रामस्थांनी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचा सत्कार करून आभार मानले.
आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील होन्निहाळ गावातील श्री हनुमान नगर (डिफेन्स कॉलनी) येथे नव्याने बांधण्यात आलेल्या काँक्रीट रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले. मागील आमदाराच्या कार्यकाळात गावकऱ्यांनी रस्ता विकसित करण्यासाठी अनेकवेळा विनंती केली होती. पण ते शक्य झाले नाही. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मात्र मागणी केली असता त्यांनी रस्ता करण्याचे आश्वासन देऊन आता रस्त्याचे काम पूर्ण केले आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
या संदर्भात त्यांनी आमदारांच्या कार्याचे कौतुक केले, त्यांचा गौरव केला, त्यांना शुभेच्छा दिल्या. या सन्मानाबद्दल आभार मानून आमदार हेब्बाळकर यांनी, आपले प्रेम, प्रोत्साहन आणि आशीर्वाद असेच राहू द्या अशी अपेक्षा व्यक्त केली.
या वेळी स्थानिक रहिवासी सिद्धप्पा तायकर, रवी केंगेरी, सुनिल वानुरा, डी. बी. हंजी, मल्लिकार्जुन तिगडी, सिद्धनगौडा पाटील, महांतेश हिरेमठ, प्रकाश मारिहाळ, रघु पाटील, बसनगौडा पाटील, रमणगौडा पाटील, मालती सुबानुर, शोभा तिगडी, सविता तायकर, गिरिजा तायकर, शोभा पाटील, रुपा पाटील, चन्नम्मा पाटील, सुमित्रा सिंगाडी, सुजाता, गायत्री नरीगौडर, दीपा नवलगी, दीपा मारिहाळ व कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments