तळवार आणि परिवार समाज बांधवांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या आरक्षणाचा सदुपयोग करून घ्यावा, असे आवाहन झोपडपट्टी विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि आमदार महेश कुमठळ्ळी यांनी केले.

अथणी येथे तळवार आणि परिवार समाज बांधवांना जात प्रमाणपत्रकाचे वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. एस टी आरक्षणाचा लाभ समाजाला शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनण्यासाठी होईल. तळवार आणि परिवार समाजाकडून अनेक वर्षांपासून एसटी समाजात समाविष्ट करण्याची मागणी करण्यात येत होती. याचा विचार करून मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सदर समाजाला एसटी जात प्रमाणपत्र देण्याचे आदेश महसूल व ईभागामार्फत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत, अशी माहिती आमदार कुमठळ्ळी यांनी दिली.

यावेळी अखिल कर्नाटक नाईक तळवार हितरक्षण वेदिकेचे अध्यक्ष रामगोंडा जंगी बोलताना म्हणाले, आपल्या समाजाकडून होत असलेल्या मागणीचा विचार करून देण्यात आलेल्या आरक्षणाचा समाजाला नक्कीच फायदा होईल. यावेळी जात प्रमाणपत्र वितरण केल्याबद्दल आमदार कुमठळ्ळी यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
यावेळी तळवार समाजाचे विश्वनाथ खेमलापूर, बरमण्णा हक्की, राजू पुजारी, महादेव नाईक, अनिल नंदेश्वर, माळू हक्की, आकाश हक्की, राज तूबची, ईश्वर चिप्पाडी, सिद्दू तळवार, तम्मण्णा मिसी, नीलकंठ ईटी, दशरथ तळवार आदी उपस्थित होते.


Recent Comments