Raibag

रायबागमध्ये भाजपचे शक्तिप्रदर्शन!

Share

बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यात भाजपाची जनसंकल्प यात्रा आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात भाजपने जोरदार शक्ती प्रदर्शन केले.

भाजपच्या या कार्यक्रमास मुख्यमंत्री आले तर जनता येणार नाही असे वक्तव्य सिध्दरामय्यांनी केले होते. मात्र यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांना या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या जनसागराची झलक दाखविण्याचे आवाहन केले. यावेळी आपल्या भाषणात बोलताना मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. आमदार सतीश जारकीहोळी यांच्यावरून टोला लगावत काँग्रेसचे वाईट दिवस सुरु झाल्याचे सांगितले. सिध्दरामय्यांनी केलेल्या घोटाळ्यांमुळे जनतेने त्यांना सत्तेवर येऊ दिलं नाही, अशी टीकाही केली.

यावेळी मंत्री गोविंद कारजोळ, भैरती बसवराज, मंत्री शशिकला जोल्ले, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार दुर्योधन ऐहोळे, पी राजीव, महादेवाप्पा यादवाड, श्रीमंत पाटील, सिद्दू सवदी, विधान परिषद सदस्य रवीकुमार, माजी खासदार रमेश कट्टी, माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, के एल इ कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे आदींसह विविध भाजप नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Tags:

raibag bjp jansankalp yatra