खानापूर येथे बुधवारी भाजपाची संकल्प यात्रा आयोजित केली असून येथे होणाऱ्या कार्यक्रमास मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची उपस्थिती असेल. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे तालुका भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.

खानापूर तालुका भाजप कार्यालयात याबाबत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे बेळगाव येथे जनसंकल्प यात्रेत सहभागी होऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता खानापूर येथे होणाऱ्या जनसंकल्प यात्रेत ते सहभागी होणार आहेत. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन खानापूर तालुका भाजपतर्फे करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी सांगितले, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा हे उद्या बेळगाव दौऱ्यावर असून खानापूर येथील मलप्रभा स्टेडियमवर होणाऱ्या कार्यक्रमात देखील सहभाग घेणार आहेत. यावेळी खानापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
राज्य कार्यकारिणी सदस्या धनश्री सरदेसाई जांबोटकर यांनी, उद्या होणाऱ्या जनसंकल्प यात्रेत कार्यकर्त्यांनी खानापूर तालुक्यातील भाजपाची ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन केले.
याचप्रमाणे भाजपचे ज्येष्ठ नेते विठ्ठल हलगेकर बोलताना म्हणाले, उद्याची जाहीर सभा पुढील निवडणुकीसाठी महत्वपूर्ण ठरणार असून राज्याचे मुख्यमंत्री कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह निर्माण करतील, सध्या गावागावात भाजपामुळे चैतन्य निर्माण झाले असून जनसंकल्प यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
माजी आमदार आणि डीसीसी बँकेचे संचालक अरविंद पाटील बोलताना म्हणाले, आठ महिन्यांपूर्वी आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून उद्या आपले समर्थकदेखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. पक्ष बळकट करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.
यावेळी भाजप मंडळ अध्यक्ष संजय कुबल, वनविकास महामंडळाचे संचालक सुरेश देसाई, बसवराज सानिकोप्प, अप्पय्या कोडोळ्ळी. सदानंद पाटील, पंडित ओगले, राजेंद्र रायका आदी उपस्थित होते.


Recent Comments