कागवाड तालुक्यातील शिरगुप्पी या गावात पदवीपूर्व महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर चिकोडी शैक्षणिक जिल्हास्तरावरील पुरुष व महिला कबड्डी संघांच्या कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
मंगळवारी माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ आणि विविध मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ झाला. यावेळी बोलताना महांतेश कवटगीमठ यांनी, स्पर्धेत जिंकणे किंवा हारणे महत्त्वाचे नसून निरोगी आयुष्यासाठी आजच्या आयुष्यातील खेळाचे महत्व त्यांनी सांगितले. श्रीकृष्ण आणि कब्बड्डी यांच्यातील संदर्भ देत प्रत्येकाने खेळात सहभाग घेण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. अलीकडे तरुण पिढी व्यसनाधीन होत असून या बाबत त्यांनी चिंता व्यक्त केली.
चिकोडी येथील पदवीपूर्व शिक्षण विभागाचे उपसंचालक पांडुरंग भंडारे यांनी , केएलई शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जिल्हास्तरावरील विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची चांगली संधी दिल्याबद्दल कौतुक व्यक्त केले. चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यांतर्गत शिरगुप्पी येथील कबड्डी स्पर्धेत आठ तालुक्यांतील मुला – मुलींच्या प्रत्येकी आठ संघांनी सहभाग घेतला असून सर्व विद्यार्थ्यांनी विजय-पराभव याची चिंता न करता मुक्तपणे कबड्डी खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले.
शिरगुप्पी येथील केएलई पदवीपूर्व महाविद्यालयाचे अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी या स्पर्धेतील स्पर्धकांचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहन दिले. या स्पर्धेत सहभागी संघांनी राज्यस्तरावर विक्रम केल्याची बाब त्यांनी अभिमानाने सांगितली.
यावेळी के एल इ संस्थेचे स्थानिक शाखा संचालक मंडळ, अध्यक्ष शिवानंद पाटील, संचालक साथगौड पाटील, रामगौडा पाटील, अण्णासाहेब पाटील, नेते अनिल कडोले, आर एस पाटील, रमाकांत बाडगे, अदगौड पाटील, सदाशिव पाटील, महावीर कात्राळे, ज्योतीकुमार पाटील, काका पाटील, बी ए पाटील, प्रा. एस बी पाटील, मुख्य न्यायाधीश एम एस कौलगुड आदी उपस्थित होते.
Recent Comments