हुक्केरी शहरातील न्यायालयाच्या आवारात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव तसेच राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचा शुभारंभ वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश के एस रोट्टेर यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना ते म्हणाले, लोकअदालतीच्या माध्यमातून लवकरात लवकर खटले निकाली काढण्यात यावेत, लोक अदालतीत नागरिकांनी सहभाग घ्यावा, कायदेविषयक जनजागृती आणि मोफत कायदेशीर सल्ला घेऊन नागरिकांनी वाद मिटवावेवत, असे आवाहन के एस रोट्टेर यांनी केले.

न्यायालय तसेच इतर कार्यालयातील प्रलंबित खटल्यांवर मध्यस्थीद्वारे तोडगा काढण्यात येईल, अशी माहिती कनिष्ठ न्यायाधीश के अंबण्णा यांनी यावेळी दिली.
यानंतर हुक्केरी तालुक्यातील विविध गावातील शाळा – महाविद्यालयात कायद्याविषयक जनजागृती करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. याचप्रमणारे जनजागृती रॅलीचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी हुक्केरी वकील संघाचे अध्यक्ष आर पी चौगुला, एम एम पाटील, डी के अवरगोळ, करोशी, मगेन्नावर आदी उपस्थित होते.


Recent Comments