नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता खानापूर परिसरातील मलप्रभा क्रीडांगणावर भाजपाची जनसंकल्प यात्रा आयोजित करण्यात आली आहे.

खानापूर येथील मलप्रभा स्टेडियम येथे होणाऱ्या जनसंकल्प यात्रेला मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यासह अनेक मंत्री व आमदार उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती भाजपचे युवा नेते पंडित ओगले यांनी खानापूर येथील पत्रकार परिषदेत दिली. खानापूर शहर व तालुक्यातील जनतेने, भाजपा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन ही यात्रा यशस्वी करावी, असे आवाहन त्यांनी केले.
राज्यात भाजपच्या जनसंकल्प यात्रेला अभूतपूर्व पाठिंबा मिळत आहे. ९ नोव्हेंबरला आपल्या खानापूरमध्ये निघणाऱ्या यात्रेत आपण सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन खानापूरमध्ये पुन्हा कमळ फुलवायचे आहे, असे आवाहन भाजप शहर व तालुका उपाध्यक्ष अपय्या कोडोली यांनी केले.
यावेळी भाजपचे सोशल नेटवर्किंग नेते राजेंद्र रायका, रवी पाटील, किरण यळ्ळूरकर, ज्वाडन गोंजाल्वीस, प्रकाश नीलजकर, रवी बडिगेर, शिवा मयेकर आदी उपस्थित होते.


Recent Comments