Kagawad

ऐनापूर येथे राज्योत्सवानिमित्त भुवनेश्वरी देवी प्रतिमेची मिरवणूक

Share

कागवाड तालुक्यातील ऐनापूर येथे रविवारी कर्नाटक राज्योत्सवानिमित्त करवे कार्यकर्त्यांच्या सहभागाने भुवनेश्वरी देवी प्रतिमा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.

माजी आमदार राजू कागे यांच्या हस्ते ऐनापूर येथील सरकारी कन्नड शाळेच्या प्रांगणात भुवनेश्वरी देवी प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी कन्नड भाषेच्या संवर्धनासाठी एकसंघपणे कार्य करण्याची शपथ घेण्यात आली.

यावेळी अभियंते प्रवीण अपराज बोलताना म्हणाले, १ नोव्हेंबर रोजी भुवनेश्वरी देवीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले होते. मात्र ऐनापूरमध्ये श्रीशैल जगद्गुरुंचे आगमन आणि आचार्य कुंतीसागर मुनी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त मिरवणूक काढण्यात आली नव्हती. आज सर्व कन्नड अभिमानी, करवे कार्यकर्ते तसेच नगर पंचायतीचे सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी एकत्रित येऊन भव्य राज्योत्सव मिरवणूक काढण्यात आल्याचे ते म्हणाले.

यावेळी नगर पंचायत सदस्य अरुण गाणीगेर, तम्मण्णा पारशेट्टी, संजय बिरडी, कुमार अपराज, आदिनाथ दानोळी, रावसाब पाटील, पायप्प कुडवकल्ली, अण्णाप्पा डुगन्नवर, रोहित पाटील अनिल माणगावे, राहुल पाटील , सचिन कुलतिप्पी, आनंद रेड्डी, गुरु कुलतिप्पी , प्रवीण बुरली, आश्रपल्ली बागवान, पद्माकर पाटील, सुप्रित अनगल्ली आदी उपस्थित होते.

Tags:

kagawad karnataka rajyotsava