कार आणि बस यांच्यात झालेल्या धडकेत दोन जण किरकोळ जखमी झाल्याची घटना चिक्कोडी शहरातील बेळगाव रस्त्यावरील चन्यानडली जवळ घडली. या अपघातात कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला.

अपघातात महाराष्ट्रातील मिरज शहरातील संग्राम आणि अजित हे जखमी झाले आहेत. दोघेजण कारने मिरजहून बेळगावकडे जात असताना ही दुर्घटना घडली. जखमींवर चिक्कोडी सरकारी इस्पितळात उपचार सुरू आहेत. चिक्कोडी वाहतूक पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे.


Recent Comments