कागवाड तालुक्यातील उगार बुद्रुक गावातील अय्यप्पास्वामी भक्तांनी केरळमधील पवित्र स्वामी अय्यप्पा यांच्या सबरी मलाई देवस्थानपर्यंतच्या 1400 किमीच्या पदयात्रेला सुरुवात केली.

शनिवारी सायंकाळी उगार बुद्रुक गावातील स्थानिक मंदिरात दरीखाण स्वामीजींच्या उपस्थितीत विधीवत पूजा करण्यात आली. सोमनाथ गुरुस्वामी, ऐनापूरचे विरुपाक्ष बडिगेर, विजापूरचे रमेश पाटील, गदग येथील अजित गोडबोले, बेक्केरीचे मारुती काळूस्वामी आणि इतर स्वामीना निरोप देण्यात आला.
यावेळी बोलताना सोमनाथ गुरुस्वामी म्हणाले, आम्ही सलग सहाव्या वर्षी उगारहून अय्यप्पास्वामींच्या दर्शनासाठी पदयात्रा काढली आहे. हे अंतर 1400 किमी असून, दररोज सुमारे 30 ते 40 किमी. पायी चालून 28 दिवसात आम्ही अंतर चालून जाऊ. येत्या 9 तारखेला वेगवेगळ्या मार्गाने निघालेल्या भाविकांना घेऊन बेळगावजवळ जमणार असल्याचे त्यांनी सांगितले. बाइट
दरिखाण स्वामीजी, उगार नगरपालिकेचे सदस्य गंगाधर कलाल अयप्पा देवाबद्दल भक्तांना माहिती देताना म्हणाले, सबरीमाला क्षेत्र हे भगवान अयप्पा यांना समर्पित असून ते केरळमधील सर्व प्रमुख मंदिरांपैकी सर्वात प्रसिद्ध आणि महत्त्वाचे आहे. अनेक बाबतीत हे स्थान अद्वितीय आहे. जात, धर्म किंवा पंथ याची पर्वा न करता मंदिर सर्वांसाठी खुले असल्याने त्याचे वेगळेपण ठळकपणे जाणवते.

सबरीमलाला जाण्यापूर्वी, भक्त त्यांचे तन मन शुद्ध करण्यासाठी 41 दिवसांचे उपवास करतात असे म्हटले जाते. वाहने फक्त पंपापर्यंत जाऊ शकत असल्याने, जंगलातून अवघड वाटेने मंदिराकडे जावे लागते. मंदिर केवळ केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या दक्षिणेकडील राज्यांतूनच नाही तर देशाच्या इतर भागांतून आणि परदेशातूनही यात्रेकरूंना आकर्षित करते.
तीर्थयात्रेचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे अयप्पा स्वामींसमोर सर्व यात्रेकरू समान आहेत. श्रीमंत किंवा गरीब, साक्षर किंवा निरक्षर सगळे समान असून ते सर्व एकमेकांना अयप्पा किंवा स्वामी म्हणून संबोधतात.


Recent Comments