कन्नड भूमी आणि भाषेचे रक्षण करणाऱ्या कन्नड समर्थक उमेदवारांनी आगामी निवडणुकीत विजयी करा असे आवाहन कर्नाटक रक्षण वेदिकेचे राज्याध्यक्ष टी. ए. नारायणगौडा यांनी केले.

संकेश्वर शहरात आयोजित कर्नाटक राज्योत्सव कार्यक्रमात त्यांनी भाग घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नारायणगौडा म्हणाले की, 2023 मध्ये होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कर्नाटक रक्षण वेदिकेचे उमेदवार रिंगणात उतरवण्यात येणार आहेत. मात्र निवडणूक लढण्यासाठी करोडो रुपयांची आवश्यक आहे, परंतु कर्नाटकच्या भूमीचे, भाषेचे जतन करणार्या कन्नडपर उमेदवारांना मतदान करण्यासाठी राज्यभर जागृती करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे करवे संस्थेच्या 25 व्या वर्धापनदिनानिमित्त राज्यात कल्याण कर्नाटक, बंगलोर शहर आणि बेळगाव शहर येथे भव्य रसमंजरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे असे ते म्हणाले.
संकेश्वर शहर महाराष्ट्राच्या सीमेला लागून असतानाही राज्योत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी करवे नेते महेश हट्टीहोळी, प्रमोद होसमनी, दिलीप होसमनी, संतोष सत्यनायक उपस्थित होते.
त्यानंतर निडसोसी जगद्गुरूंच्या उपस्थितीत राज्योत्सवानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले.


Recent Comments