बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी उपविभागाचे प्रांताधिकारी संतोष कामगौडा यांची राज्य सरकारने अचानक केलेल्या बदलीला स्थगिती देण्यात आली आहे.

उलचे चिक्कोडी तालुक्यातीलच असलेले केपीएससी अधिकारी संतोष कामगौडा यांची चिक्कोडीच्या प्रांताधिकारीपदावरून बदली करून आयएएस अधिकारी माधव गिते यांची त्यांच्याजागी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर लोकाभिमुख व प्रामाणिक अधिकारी संतोष कामगौडा यांच्या बदलीचा आदेश मागे घेण्यासाठी अनेक संघटना व नागरिकांनी आंदोलन केले होते.
दरम्यान, या बदलीच्या आदेशाविरोधात स्वता संतोष कामगौडा यांनी कर्नाटक प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे (कॅट) धाव घेतली होती. त्यानंतर कर्नाटक प्रशासकीय न्यायाधिकरणाने कामगौडा यांच्या बदलीच्या आदेशाला स्थगिती दिली. त्यानुसार, संतोष कामगौडा यांना पुन्हा चिक्कोडीचे उपविभागीय अधिकारी म्हणून कायम राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


Recent Comments